या ब्लॉगचा उद्देश एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.या ब्लॉगची सामग्री सोशल मीडियामधून घेतली आहे.

Tuesday, February 20, 2018

मूल्यमापन गुणदान तक्ते भरणे बाबत

S.S.C परीक्षा मार्च 2018 अंतर्गत मूल्यमापन गुणदान तक्ते


*OMR गुणपत्रके भरताना घ्यावयाची दक्षता*
OMR गुणपत्रक म्हणजे काय ?
Optical mark recognition
--------------------------------------------------------
🔹 OMR गुणपत्रक भरताना सर्व माहिती इंग्रजी कॅपिटल लेटर्स मध्ये *काळ्या किंवा निळ्या* बॉलपेनने भरायचे आहे (एकदा काळे, एकदा निळे असे नको). अक्षर व अंकाचे वळण (style) A B C D..... आणि 1 2 3 4 ... यासारखे (गुणपत्रिकेवर दाखवल्या प्रमाणे ) असले पाहिजे. मराठी किंवा दुसऱ्या - तिसऱ्या लिपीतील style वापरू नये.
------------------------------------------------------

🔹 ग्रेड लिस्ट गुणपत्रिकेत वापरलेल्या काही संज्ञाचा अर्थ :
P1 = शारिरीक शिक्षण
R6 = व्यक्तिमत्व विकास
J1 to J9 = कार्यानुभव अंतर्गत विषय (उदा. J2 : ब्रेड-बिस्कीट, इत्यादी )
P2 to P9 = ऐच्छीक विषय (उदा.P6 :समाजसेवा, इत्यादी )
N = Not applicable
A = Absent
T = Technical
I. = Isolated (तुरळक विषय घेऊन बसलेले)
M = Missing (दुसऱ्या शाळेतल्या विद्यार्थ्याचा नंबर चुकन आपल्यात आला असल्यास)
--------------------------------------------------------
🔹ग्रेड कोड 0 ते 5 चा अर्थ गुणपत्रकात खाली NOTE मध्ये दिले आहे.
-------------------------------------------------------

🔹 विषयाच्या OMR गुणपत्रिकेत वापरलेल्या संज्ञा
1. AA = Absent
2. HH = HUNDRED MARKS

यामध्ये विद्यार्थी जरी N C असेल तरीही त्यासाठी Absent असाच शेरा येईल.

टेक्निकलच्या V1, V2  सारख्या विषयाचे प्रात्यक्षिक 100 गुणांचे आहेत.  यात 100 पैकी 100 गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे गुण नोंदवता यावेत यासाठी HH हि संज्ञा वापरली आहे. गुणपत्रिकेत 3 अंकी संख्या नोंदवण्याची सोय नसल्यामुळे हि व्यवस्था करण्यात आली आहे.
(काही जण HH म्हणजे Handicap असा चुकीचा अर्थ घेत आहेत)
-------------------------------------------------------
🔹 विषयाची OMR गुणपत्रके बोर्डाने दिलेल्या खाकी पाकिटात (ENV NO - 2 मध्ये)  मावत नाहीत, म्हणून आपल्याकडील सुयोग्य आकाराचे पाकीट वापरावे.
सर्व (मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, सामाजिक शास्त्रे ICT) विषयांच्या गुणपत्रिका एकाच पाकीटात ठेवायच्या आहेत
-------------------------------------------------------
🔹 सामाजिक शास्त्राच्या OMR गुणत्रिकेवर या विषयाचे नाव अनवधानाने History & Civics असे छापले आहे. ते *Social Science* असे आहे हे लक्षात घ्यावे.
-------------------------------------------------------
🔹 विषयाच्या OMR गुणपत्रिकेत *External Examiner* साठी रकाना दिला आहे. यात सही कोणाची घ्यायची याबाबत खुलासा :-
फक्त विज्ञान व तंत्रज्ञान विषयासाठी बाह्य परिक्षकाची सही घ्यावी. इतर सर्व विषयाच्या तोंडी / प्रात्य. परीक्षेसाठी आपल्या शाळेतीलच  विषय समितीतील शिक्षक, परीक्षक म्हणून नेमतो, त्याची external च्या जागी सही घ्यावी.
------------------------------------------------------
🔹 एकूण लिफाफे किती ? त्यात कोणती कागदपत्रे भरावीत ?

1) ENV NO. 1 : विज्ञान प्रात्य. उत्तरपत्रिका
2) ENV NO. 2 : मराठी ते ICT सर्व विषयाची OMR गुणपत्रके
3) GRADE LIST : सर्व श्रेणी तक्ते
4) BILL 4 REMU : विज्ञान प्रात्य. परीक्षेची बिले
5) KALCHACHANI : कलचाचणीचे उपस्थिती पत्रक, अपलोड प्रमाणपत्र, कव्हरिंग लेटर
------------------------------------------------------
🔹 OMR गुणपत्रके भरताना चुका होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी आधी झेरॉक्स वर कच्चे काम करावे, मग ते समोर ठेवून नंतर पक्के गुणपत्रक भरावे म्हणजे चुका होणार नाहीत.
------------------------------------------------------

No comments:

Post a Comment