या ब्लॉगचा उद्देश एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.या ब्लॉगची सामग्री सोशल मीडियामधून घेतली आहे.

Tuesday, July 7, 2020

मुख्याध्यापकांच्या वेतन वाढी साठी संस्था चालक वेठीस धरत असेल तर शिक्षणाधिकारी वेतन वाढ देणार मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी* *यांच्या बैठकीत प्रविण पाटील शिक्षण उपसंचालक यांची माहिती* . *नाशिक* -




♦ *मुख्याध्यापकांच्या वेतन वाढी साठी संस्था चालक वेठीस धरत असेल तर शिक्षणाधिकारी वेतन वाढ देणार मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी* *यांच्या बैठकीत प्रविण पाटील शिक्षण उपसंचालक यांची माहिती* .   *नाशिक* -
 *शालार्थ आयडीचे रखडलेले प्रस्ताव मार्गी लावण्याबरोबरच जिल्ह्यातील शिक्षकांना नियमानुसार देय असलेली हक्काची वार्षिक वेतन वाढ* *मंजुरीसाठी बहुसंख्य शिक्षणसंस्था चालकांकडून शिक्षकांना वेठीस धरले जात असल्याची तक्रार जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून* *माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांच्याकडे मंगळवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. शिक्षकांना वार्षिक वेतन वाढ देण्याचे अधिकार* *मुख्याध्यापकांना देण्यात यावेत आणि त्यासाठी शिक्षणसंस्थेच्या ठरावाची अट रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.* 
 *जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या मोजक्याच पदाधिका-यांच्या उपस्थितीत बैठक* *संपन्न झाली. शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांची नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर प्रभारी म्हणून शासनाने नेमणूक केल्याबद्दल नाशिक जिल्हा* *मुख्याध्यापक संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव  एस. बी. देशमुख यांनी या* *बैठकीचे प्रास्ताविक करून जिल्ह्यातील विविध शाळा व शिक्षकांचे प्रश्न प्रविण पाटील यांच्याकडे मांडले. जिल्ह्यातील बहुतेक शाळांत शिक्षण संस्थाचालक* *शिक्षकांना नियमानुसार देय असलेली वार्षिक वेतनवाढ मंजूर करतांना वेठीस धरतात* . *त्यामुळे वेतनवाढ मंजुरीचे अधिकार मुख्याध्यापकांनाच देण्यात यावे अशी आग्रही मागणी एस.बी.देशमुख यांनी यावेळी* *केली.शालार्थ आयडीचे रखडलेले प्रस्ताव, डी एड To बी एड मान्यता प्रस्ताव, वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी मंजुरी, सेवा निवृत्त मुख्याध्यापक व शिक्षक भविष्य* *निर्वाह निधी प्रस्ताव, रिक्त पदावरील, बढतीचे व मुख्याध्यापक बदलीचे प्रस्ताव मंजुर करणे, शिक्षकेत्तर पदांना मान्यता देणे, प्लॅन मधील शाळा व तुकड्यांचे वेतन* *नॉन फ्लॅनमध्ये समाविष्ट करणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने ऑनलाइन अभ्यासक्रम कमी करणे , अनुकंपा तत्वा वरती भवती* *व मान्यता देणे . बदली अथवा प्रमोशन झालेल्या मुख्याध्यापक शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन पथक कार्य लया कडून Attach व Dettach  करून मिळावे .TSP -* *१९०१ लेखा शीर्षा खाली जिल्हयातील ३ शाळा व १७ तुकड्या आहेत त्यांना .Grant  उपलब्ध नसल्याने में . २०२० पासून पेमेन्ट नाही . अशा शाळा १३ वर्षापासून* *plan मध्येच आहे . त्यांना त्वरित Non Plan मध्ये आणने . वेतनेत्तर अनुदान त्वरीत देणे . सेवा सातत्य व पेंन्डींग संच मान्यता लवकर निकाली काढणे या वआदि महत्त्वाच्या* *मागण्यांवर यावेळी चर्चा झाली. या मागण्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी प्रविण पाटील यांनी* *दिले* .    
 *या बैठकीस माणिक मढवई, आशा पवार, बी.के. शेवाळे, डॉ संगीता बाफणा, बाबासाहेब खरोटे, मनोज वाकचौरे, सोमनाथ जगदाळे, पुरुषोत्तम रकिबे, सचिन दिवे, संजय जाधव, आर.एल* . *चिने, एन.वाय. पगार,  एच. एम.  खरोटे, पी.के.भाबड, दशरथ जारस , खरोटे सर नांदगांव आदि मुख्याध्यापक व* *शिक्षक उपस्थित होते. बाबासाहेब खरोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.*

No comments:

Post a Comment