आज दि.०५ जुलै २०२० रोजी राज्यातील इ.१० वी मराठी माध्यम, इ.१० वी इंग्रजी माध्यम व इ.१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी जिओ टी.व्ही.वर स्वतंत्र ३ ज्ञानगंगा शैक्षणिक चॅनेलचे उद्घाटन मा.वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण यांच्या हस्ते करण्यात आले.
जिओ टी.व्ही वरील हे चॅनल पाहण्यासाठी
• JIO TV पाहण्यासाठी JIO मोबाइल क्रमांक व इंटरनेट सुविधा आवश्यक
• Playstore अथवा MY JIO app वरून Jio TV हे app डाऊनलोड करावे.
• सदर app वर Login करण्यासाठी आपला jio मोबाइल क्रमांक व आलेला OTP टाकावा
• “Categories” या Option मधून “Educational(६५)” हा Option निवडावा
• Scroll करीत आल्यास ज्ञानगंगा १०वी मराठी, ज्ञानगंगा १० वी ENGLISH, ज्ञानगंगा १२वी SCIENCE हे channel निवडावेत.
जिओ सावन वरील रेडीओ कार्यक्रम ऐकण्यासाठी
• JIOSaavn रेडीओ ऐकण्यासाठी स्मार्ट फोन व इंटरनेट सुविधा आवश्यक
• Playstore वरून JIOSaavn app डाऊनलोड करावे.
• Podcast मधून महावाणी (Mahavani) हा ऑप्शन निवडावा तिथे आपणास रेडीओ ऐकण्यास उपलब्ध असेल.
-
दिनकर पाटील
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment