या ब्लॉगचा उद्देश एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.या ब्लॉगची सामग्री सोशल मीडियामधून घेतली आहे.

Tuesday, June 16, 2020

रेड झोनमधील शाळांसाठी स्वतंत्र SOP लवकरच


दिनांक:१६/०६/२०२०
रेड झोनमधील शाळांसाठी स्वतंत्र SOP लवकरच    
: शिक्षणमंत्री गायकवाड...

*राज्य सरकारचा आदेश "CBSE" व "lCSE" शाळांना बंधनकारक...*

*मुंबई:*
_राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने जो आदेश ऑनलाइन तसेच ऑफलाइन शिक्षणासंबंधी शाळांना जारी केला आहे, तो सीबीएसई आणि आयसीएसईच्या राज्यातील शाळांनादेखील बंधनकारक असणार आहे. तसे पत्र या दोन्ही बोर्डांना पाठवण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यांनी मंगळवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेमार्फत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. दरम्यान, कोविड -१९ रेड झोनमधील शाळांसाठी स्वतंत्र एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) लवकरच जारी होणार असल्याची महत्त्वाची माहितीही त्यांनी दिली._

_शिक्षण विभागाने अनुदानित, विनाअनुदानित खासगी शाळांसाठी सोमवारी १५ जून रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. कोविड -१९ संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शाळा ऑनलाइन वा ऑफलाइन सुरू करण्याबाबतचे निकष, खबरदारी आणि अन्य सूचनांचा यात समावेश आहे. हा जीआर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांच्या राज्यातील संलग्न शाळांनादेखील लागू असेल असे त्यांनी सांगितले._

_त्या म्हणाल्या, 'बालभारतीच्या माध्यमातून ५५ लाख पुस्तकांचे वाटप झाले आहे. ऑनलाइन पुस्तकेही विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. दूरदर्शन व रेडिओसाठी पाठपुरावा सुरू आहे. दीक्षा अॅप विद्यार्थ्यांच्या मदतीला आहे. टाटा स्कायची शैक्षणिक वाहिनी सरकारच्या मदतीला दिली आहे.जिओनेही सहकार्य केलं आहे.वेगवेगळे ऑनलाइन कंटेंट जमा करत आहोत. टीव्ही, ऑनलाइनच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहचत आहोत.'_

No comments:

Post a Comment