वर्क फ्रॉम होम |
उद्या शाळा सुरू होणार नाहीत, असं स्पष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार कपिल पाटील यांना आज रात्री।उशिरा सांगितले.
उद्या 15 जून शिक्षकांनी शाळेत जाण्याची गरज नाही. वर्क फ्रॉम होम करावे. शाळा कधी सुरू करायच्या त्याचा निर्णय उद्या मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन केला जाईल. असे शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी रात्री 8.30 वा. आमदार कपिल पाटील यांना सांगितले.
शाळा उद्या सुरू करण्याचे आदेश शिक्षण अधिकारी यांनी दिले होते. त्यामुळे प्रचंड गोंधळाचे व संभ्रमाचे वातावरण होते.
अखेर आमदार कपिल पाटील यांच्या मध्यस्तीनंतर शिक्षण आयुक्त रात्री उशिरापर्यंत याबद्दलचे आदेश काढत आहेत.
शिक्षण आयुक्त यांनी फोनवरून कपिल पाटील यांना सांगितले की, आदेश आलेले आहेत. आम्ही कळवत आहोत.
आपला स्नेहांकित
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष,
शिक्षक भारती,महाराष्ट्र राज्य
No comments:
Post a Comment