*सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) वर बोलु काही.*
*भाग 1*
संकल्पना व लेखन ...
*डि.पी.जाधव*
9823 2140 28
8830 6522 27
शासकिय कर्मचा-याची मूळ सेवा पुस्तिका म्हणजे ....मी तर म्हणेन *त्याचाअात्माच....!*
त्यामुळे अगदी सेवा निव्रुत्त होईपर्यंत व त्यानंतर ही हा अतिशय महत्वाचा दस्तावेज शेवट पर्यंत जपून ठेवणे आवश्यक आहे.
सेवा पुस्तिका अद्यावत करणे व जपुन ठेवणे ही जबाबदारी कर्मचा-याच्या वरिष्ठ कार्यलायाची म्हणजे प्रा.शिक्षक असेल तर पंचायत समिति ची.
माध्यमिक शिक्षक असेल तर प्रशालेची.
परंतु पंचायत समिती स्तरावर शिक्षक कर्मचा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे व तेथे हे काम पाहणा-या कर्मचा-यांची संख्या तोकडि पडत असल्यामुळे व इतर कामांचेच प्रमाण जास्त असल्यामुळे सेवापुस्तिका अद्यावत व परिपूर्ण केल्या जात नाही.
हे जरी सत्य असले तरी स्वता: कर्मचा-याने याबाबत दक्ष राहुन सेवा पुस्तिकेकडे लक्ष देणे आवश्यक अाहे.
याबाबत चा त्रास मग जेव्हा सेवा निव्रुत्ति जवळ येते त्यावेळेस जाणवतो.
त्यावेळेस मग महत्वाच्या नोंदी करायच्या असतील तर ते रेकार्ड सापडत नाही.
प्रशालेच्या स्तरावर मात्र सेवापुस्तिका ब-यापैकी अद्यावत असतात कारण तेथे शिक्षकसंख्या मर्यादित असते व स्वतंत्र लिपिक असल्यामुळे एवढि अडचण नसते .
दुसरे महत्वाचे म्हणजे कर्मचा-याला पाहिजे तेंव्हा सेवापुस्तिका पाहता येते व वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी करण्याविषयी सांगुन सेवापुस्तिका अद्यावत करुन घेता येते.
असं पंचायत समिती स्तरावर कर्मचा-याला करणे शक्य होत नाही.
तरी पण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा कर्मचा-याने सेवापुस्तिका हातात आल्यावर नोंदी अद्यावत केल्या कि नाही याविषयी खात्री करणे.
एवढे जरी आपण केल तरीे भविष्यात होणारा त्रास आजच अापण टाळु शकतो.
*सेवानिव्रुत्ती वेतन*
जे जे आपणासी ठावे......!!!!
मागच्या मे महिण्यात कुंभेफळ केंद्रातील श्रीम.कुंदा कुलकर्णी यांचे सेवानिव्रुत्तीला अवघे ४/५ महिने बाकी असतांना आकस्मिक निधन झाले.
मागे फक्त त्यांचे आजारी सेवानिव्रुत्त पती.
श्रीम.कुलकर्णि यांच्या एका मैत्रिनिने family pension च्या कार्यवाही साठी प्रयत्न सुरु केले.
मूळ सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) हातात पडल्यावर आणि त्याची तपासणी केली असता तब्बल ३० ते ३५ नोंदी अपुर्ण असल्याचे निदर्शनास आले.त्यापैकी काही नोंदी जालना जिल्ह्यातल्या विविध ठिकाणच्या .
या सर्व नोंदी पुर्ण झाल्याशिवाय त्यांच्या आजारी पतिला family pension मिळणे अशक्य आहे.
आता यक्षप्रश्न असा की, या *अपुर्ण नोंदी पुर्ण करायच्या कशा?*
*त्या साठी कागदपत्र मिळवायचे कुठुन? ?*
*दुस-या जिल्ह्यात जावुन संबंधित अधिका-याच्या सह्या घ्यायच्या कशा?*
प्रसंग सांगायचे तात्पर्य जर या सगळ्या नोंदी वेळिच संबंधित कार्यालयाने पुर्ण केल्या असत्या तर कुलकर्णी कुटुंबावर आज नोंदी पुर्ण करण्यासाठी व family pension साठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली नसती.
शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामूळे व कार्यालयात असणारी लिपिक मंडळीची मानसिकता यामुळे सेवा पुस्तिका अपुर्ण राहतात.
आणि मग अशी काही एखादी अप्रिय घटना घडली तर कुटुंबाला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.
सेवा पुस्तिका पुर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारि प्रा.शिक्षकांच्या बाबतीत पंचायत समिती आणि माध्य.शिक्षकांच्या बाबतील प्रशाला कार्यालयाची असते पन आपलंही कर्तव्य आहे कधी तरी त्याविषयी चो्ैकशी व खात्री करणे. वेळ निघुन गेल्यावर काहीच करता येत नाही आणि कोणाविरुद्ध तक्रारही करता येत नाही.
म्हणुन प्रत्येकाने आपल्या सेवा पुस्तिके विषयी सजग राहिले पाहिजे असं मला वाटतं........कारण कोण दिवस येई कसा कोण जाणतो....??
( सर्वाच्या माहीतिसाठी सर्व ग्रुपवर ही पोस्ट शेअर करा)
*भाग दुसरा*
*सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) वर बोलु काही......*
*सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर अाढळणा-या काही त्रुटी.....!* 👇
१.सर्व सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी एक त्रुटी म्हणजे *गटविमा नोंदी*.
गटविम्याच्या नोंदी मधे खालील प्रकारच्या त्रुटी आढळुन येतात..
१. गटविमा नोंद करतांना ज्या वेतन बिलात गटविमा वर्गणी कपात झाली त्या व्हाँवचर नंबर ची नोंद नसणे
२.गटविमा नोंदीत खाडाखोड असणे.
३. शासन नियमाप्रमाणे वेळोवेळी गटविमा वर्गणित झालेल्या बदलानुसार सुधारित नोंदी नसणे.
४. एखाद्या कर्मचा-याची पदोन्नती झाली असेल तर वेतनश्रेणीच्या अनुषंगाने गटविमा वर्गणी कपात नसणे
५.सुधारित वर्गणी कपात उशिरा सुरु करण्यात आली असेल तर त्या वर्गणीच्या फरकाची नोंद नसणे.
६.गटविमा नोंदिवर गशिअ/
मुअ यांची स्वाक्षरी नसणे
अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात
यामुळे सेवानिव्रुत्ती नंतर गटविमा रक्कम परतावा परत घेतांना वर्गणी कपात होवुन ही योग्य ती नोंद नसेल तर वर्गणीची रक्कम व्याजासह भरावी लागते.
त्या शिवाय आपल्याला आपली जमा असलेली गटविमा परताव्याची रक्कम जिल्हा परिषद देत नाही.
*त्यामुळे कर्मचा-याने आपल्या गटविम्याच्या नोंदी अद्यावयत आहे की नाही याची खात्री केलेली बरी.
( सर्वाच्या माहीतिसाठी सर्व ग्रुपवर ही पोस्ट शेअर करा)
*भाग तिसरा*
*सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) वर बोलु काही......*
*सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर अाढळणा-या काही त्रुटी.....!* 👇
अजुन एक सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी त्रुटी म्हणजे *कार्यमुक्ती व उपस्थिती बाबत नोंदी*.
*कर्मचा-याची बदली झाल्यानंतर त्याबाबतची कार्यमुक्ती व उपस्थिती ची नोंद अादेश क्रमांकासह व दिनांकासह सेवापुस्तिकेत असणे अावश्यक आहे.*
सामान्यपणे आढळणा-या त्रुटी.
१. कार्यमुक्ती व उपस्थिती ची नोंद सेवापुस्तिकेत नसणे.
२. सविस्तर आदेशासह व दिनांकासह नोंद न घेता संक्षिप्तपणे नोंद असणे.
३. नोंद घेतलेली असते पन त्यावर गशिअ ची स्वाक्षरी नसणे.
४.कधि कधि कार्यमुक्ती ची नोंद असते पन उपस्थितिची नोंद नसणे
अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.
यामुळे बदली झालेल्या सर्व नोंदी जर नसेल तर सेवानिव्रुत्ती वेतन प्रस्ताव मंजुर करतांना त्रुटी दर्शवुन प्रस्ताव परत केला जातो.
*त्यामुळे कर्मचा-याने आपल्या बदलिच्या सर्व नोंदी अद्यावयत आहे की नाही याचीही खात्री केलेली बरी.
सर्वाच्या माहीतिसाठी सर्व ग्रुपवर ही पोस्ट शेअर करा.
*भाग चौथा*
*सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) वर बोलु काही......*
*सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर अाढळणा-या काही त्रुटी.....!* 👇👇
अजुन एक सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी त्रुटी म्हणजे
*वारसाबाबत नामनिर्देशन*
*अाजच्या बेभरवशाच्या काळात माणसाचे कधी काय होईल याचा नेम नाही त्या मुळे दुर्दैवाने जर कर्मचा-याच्या बाबतीत काही बरी वाईट घटना घडली तर सेवापुस्तिकेत नामनिर्देशनाची नोंद योग्य प्रकारे नसेल तर पुढिल मिळणा-या आर्थिक लाभासाठी व इतर कामासाठी कुटुंबियाना कोर्ट कचेरीत खेट्या माराव्या लागतात त्यासाठी सेवापुस्तिकेत नामनिर्देशनाची योग्य नोंद असणे अावश्यक आहे.*
*अापण जर आजच्या तारखेत नामनिर्देशन केले असेल तर ते आवश्यकता वाटल्यास सहा महिण्यानंतर ते बदलू शकतो*
*सामान्यपणे आढळणा-या त्रुटी.*
१. नामनिर्देशाना ची नोंद
सेवापुस्तिकेत नसणे.
२. चार प्रकारच्या
नामनिर्देशन
नोंदी पुर्णनोंद नसणे.
३. नोंद घेतलेली असते पन
त्यावर गशिअ / मुअची
स्वाक्षरी नसणे.
४.सुरुवातिला केलेल्या
नामनिर्देशनात कालांतराने
वारसाच्या नावात बदल
अथवा वारसात बदल
झाला असेल तर त्याबाबत
नोंद अद्यावयत नसणे.
अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.
यामुळे एखादा कर्मचारी दुर्दैवाने सेवेत कार्यरत असतांना मयत झाला तर कुटुंबियासमोर अनेक अडचणी येतात.
*त्यामुळे कर्मचा-याने आपल्या नामनिर्देशना बाबतच्या सर्व नोंदी अद्यावयत आहे की नाही याचीही खात्री केलेली बरी.*
*भाग* 6⃣
*सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) वर बोलु काही......*
*पुढे येणा-या काही महिण्यात कर्मचा-यांच्या बाबतीत दोन महत्वाच्या गोष्टी होणार अाहे ....!*
👇
*१. सातवा वेतन अायोग.*
येत्या काही महिण्यात सर्वांना बहुप्रतिक्षित असा सातवा वेतन आयोग लागु होणार असल्यामुळे जर मुळवेतना बाबतच्या काही त्रुटी असतिल तर सातव्या आयोगाप्रमाणे होणारी वेतननिश्चती चुकीची होईल.
त्यामुळे एकतर वेतन जास्त मिळेल किंवा कमी.
*अागामी वेतन आयोगात होणा-या सगळ्या बाबी अचुक होण्यासाठी वेतनाबाबत च्या त्रुटी काळजीपुर्वक वरिष्ठ कार्यालयाकडुन पुर्ण करुण घेणे आवश्यक अाहे .*
*त्यासाठी महत्वाचे म्हणजे*
*जि.प.च्या वित्त विभागाकडुन सेवापुस्तिकेची अाज पर्यंत मिळालेल्या *सर्व वेतन अायोगाची व इतर वेतन निश्चितीची वेतन पडताळणी होणे गरजेचे आहे.वेतनात काही तफावत असेल तर वेतनपडताळणीत ते समोर येईल पर्यायाने त्याची दुरुस्ती करणे सॊपे होईल.*
*वरिल सर्व बाबिंची पडताळणी झालेली असेल अाणि पडताळणीत जि.प.लेखाधिका-यांनी काही आक्षेप नोंदवले असेल तर त्या सर्व अाक्षेपांची पुर्तता करणे आवश्यकच*
*२.सर्व्हिस बुक online*
दुसरी महत्वाची बाब म्हणजे येणा-या काही महिण्यात सेवापुस्तिका online होणार अाहे.
त्यामुळे सेवापुस्तिकेत जर काही त्रुटी असतील तर त्या तशाच online upload होतील.
परीणामी कर्मचा-याला भविष्यात अडचणी निर्माण होवू शकतात.
*यासाठी सेवापुस्तिकेत काही त्रुटी असतील त्या वेळिच दुरुस्त होणे गरजेचे अाहे.*
*भाग 7⃣ *बदली विशेष*
*बदली झाल्या नंतर सेवापुस्तिका नविन कार्यालयात जमा करण्यापुर्वी..... अत्यंत महत्वाचे*
१. मूळ सेवा पुस्तिकेत
कार्यमुक्तिबाबत सविस्तर
नोंद व
मा.गशिअ यांची स्वाक्षरी
असल्याबाबत खात्री
करणे.
२. यापूर्वि केलेल्या नोंदींवर
मा.गशिअ यांची स्वाक्षरी
असल्या बाबत खात्री
करणे.
उदा. गटविमा नोंद
नामनिर्देशन नोंद
रजा मंजुरि नोंद
प्रशिक्षण नोंद
जादा अदाई वसुलि.
स्थायित्वा बाबत नोंद
मराठि/हिंदी परीक्षा सुट.
३. कार्यमुक्तिच्या तारखे पर्यंत
रजेचा हिशोब पुर्ण
असल्याबाबत खात्री करा .
४.कार्यमुक्तिच्या तारखे पर्यंत
सेवा पडताळणी बाबत
नोंद असल्याची खात्री
करा
५. ज्या शाळेवर उपस्थित झाले त्या बाबत अादेश क्रमांका सहित सविस्तर उपस्थिति बाबत नोंद मूळ सेवा पुस्तिकेत करवून घ्या.
६. L.P.C. वर स्वता:चा
शालार्थ ID असल्याबाबत
खात्री करा.
*७.अत्यंत महत्वाचे*
*माहे फेब्रु..२०१८ च्या
वेतनातुन वै.अपघात विमा
वर्गणी कपात झाली असेल तर सेवा पुस्तिकेत प्रमाणक क्रमांक टाकुन त्याबाबत नोंद घेणे.*
८.मागील एक दोन वर्षाच्या काळात काही जादा अदाई/ रिकव्हरी अदा केली असेल तर त्याबाबत नोंद केल्याची खात्री करा. रिकव्हरीचे विवरणपत्र जपुन ठेवा.
उदा. Mscit रिकव्हरी
5.5.10 नुसार रिकव्ह
गटविमा फरक.इ.
*धन्यवाद.....!!!!*
*भाग* 8⃣
*सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) वर बोलु काही......*
*चट्टोपाध्याय अायोगानुसार शिक्षकांना दिल्या जाणा-या वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी या दोन्ही श्रेण्याबाबत ब-याचदा गोंधळ उडतो वरिष्ठ कोणती न निवड कोणती आणि कोण त्यासाठी पात्र ??*
*साधारण पणे एकाच वेतनश्रेणीत १२ वर्ष वेतन घेतले कि त्यापुढची वरिष्ठ श्रेणी मिळते. अाणि वरिष्ठ वेतन श्रेणीत १२ वर्ष वेतन घेतले की त्या पुढची मग निवडश्रेणी मिळते .पण यासाठी शासनाने विहित केलेल्या अटि पुर्ण केल्या नंतरच ..*
*मागच्या वर्षी शासनाने काढलेल्या २३ अाक्टो २०१७ मधील चट्टोपाध्यायच्या सुधारीत जी.आर. मधील नियम व अटी बघितल्या तर यापुढे कोणाला वरिष्ठ किंवा निवडश्रेणी मिळेल असे वाटत नाही.*
*विशेष करुन संभ्रम पडतो तो निवडश्रेणी बाबत.*
*उदा. जर एखाद्या प्रा.शिक्षकाने १२ वर्षानंतरची वरिष्ठ श्रेणी ग्रेडपे ४२०० घेतली तर याच ग्रेडपे मध्ये १२ वर्ष वेतन घेतल्यानंतर पुढची निवडश्रेणी म्हणजे ग्रेडपे ४३०० मिळेल अर्थातच विहित नियम व अटी पुर्ण केल्या तरच.*
*परंतू एखाद्या प्रा.शिक्षकाने वरिष्ठ श्रेणी ग्रेडपे ४२०० घेतल्यानंतर त्याने प्रा.पदवीधर वेतनश्रेणी ,मुअ किंवा माध्यमिक शिक्षकाची वेतनश्रेणी ग्रेडपे ४३०० स्विकारली तर त्या शिक्षकाला या पुढची कोणतीच चट्टोपाध्यय श्रेणी मिळत नाही.*
*याचे कारण असे की , ग्रेडपे ४२०० ही प्रा.शिक्षकाची चट्टोपाध्ययची वरिष्ठ श्रेणी अाहे .आणि यापुढची निवडश्रेणी ग्रेडपे ४३०० अाहे.*
*वारंवार ब-याच जनांकडुन असा प्रश्न विचारल्या जातो की, मी चट्टोपाध्याय वरिष्ठ श्रेणी ४२०० घेतल्यानंतर पुढे प्रा.पदवीधर किंवा मुअ किंवा माध्यमिक शिक्षकाची वेतनश्रेणी ग्रेडपे ४३०० घेवून मला १२ वर्षे याच वेतनश्रेणीत झाली .मग आता मला ४४०० ग्रेड पे मिळेल का ????*
*तर वरिल प्रश्नाचे उत्तर राहिल नाही. अशा शिक्षकाला ४४०० ग्रेड पे मिळणार नाही*
*याचे महत्वाचे कारण म्हणजे एका कर्मचा-याला दोनदा चट्टो.वरिष्ठश्रेणी देता येत नाही.*
*प्रा.शिक्षकाची वरिष्ठश्रेणी ग्रेड पे ४२०० अाहे.*
*अाणि प्रा.पदवीधर ,मुअ व माध्यमिक शिक्षकाची वरिष्ठ श्रेणी ग्रेड पे ४४००*
*असल्यामुळे वरिल प्रश्न असलेल्या शिक्षकांना ग्रेड पे ४३०० मध्ये १२ वर्ष जरी झाले तरी प्रचलित नियमानुसार तरी कोणतिही पुढची वेतनश्रेणी मिळणार नाही.*
माहितिस्तव 👇👇
********************** *प्राथमिक शिक्षक*
*मुळवेतन श्रेणी*
*ग्रेड पे -२८००*
*वरिष्ठश्रेणी.ग्रेडपे ४२००*
*निवडश्रेणी ग्रेडपे ४३००*
**********************
*प्रा.प.शि./ मुअ/माध्य.शिक्षक*
*मुळवेतन श्रेणी*
*ग्रेड पे -४३००*
*वरिष्ठश्रेणी.ग्रेडपे ४४००*
*निवडश्रेणी ग्रेडपे ४८००*
*.........धन्यवाद!!!
*भाग* 9⃣
*वैद्यकिय प्रतिपुर्ती विशेष*******
*(मेडिकल फाईल)*
*कर्मचा-याच्या जिव्हाळ्याचा अजुन एक महत्वाचा विषय म्हणजे वैद्यकिय प्रतिपुर्ती प्रस्ताव*
*कारण प्रत्येकाला कधि न कधी दवाखाण्यातील भरमसाठ खर्चाचा अाकस्मिक सामना करावा लागतोच*
*या विषयी पूर्ण माहिती नसल्यामुळे व प्रस्ताव तयार करतांना त्यामधे त्रुटी राहिल्यामुळे कर्मचारी बरेचदा या शासनाच्या योजनेपासुन वंचित राहतो.*
*त्यामुळे अाज या योजनेबद्दल थोडेसे महत्वाचे......!*
*शासन निर्णय सा.अारोग्य विभाग दि.१९/३/२००५ च्या सहपत्रानुसार शासनाने या योजनेसाठी २७ अाकस्मिक अाजार व ५ गंभीर आजाराची यादी घोषित केलेली अाहे.*
*वरिल यादितिल अाजारासाठी कर्मचा-याने आपल्या कुटूंबातिल एखाद्या सदस्याला दवाखान्यात दाखल करुन खर्च केला असेल तर अाजाराच्या स्वरुपानुसार ९० ते १०० टक्क्यापर्यंत खर्च कर्मचा-याला वैद्यकिय प्रतिपूर्तीच्या रुपाने परत मिळु शकतो.*
*या साठी खालिल गोष्टी महत्वाच्या*
⬇
*१.वरिल यादीतिल २७ किंवा ५ या पैकिच अाजार असावा.*
*२ रुग्णाला दवाखान्यातुन डिस्चार्ज झाल्यापासुन १ वर्षाच्या अात वैद्यकिय प्र.प्रस्ताव जि.प.ला अथवा कर्मचा-याच्या वरिष्ठ कार्यालयाला दाखल करणे अावश्यक.*
*३.अारोग्य विमा कार्यालयाकडुन अथवा धर्मदाय संस्थेकडुन या बाबतचा खर्च दवाखान्याला अदा करण्यात आला असेल तर प्रस्ताव दाखल करता येत नाही .*
*४.विहित नमुण्यातिल साधारणपणे ३०/४० पेजेसचा हा प्रस्ताव पुर्ण करुण डिस्चार्ज झाल्यापासुन एक वर्षाच्या अात दाखल करणे अावश्यक.*
*५. रु.१०००००/*
*(एक लाख) पर्यंतचे वै.प्र. प्रस्ताव मंजुरीचे अधिकार मा.E.O.यांना अाहे.*
*६* *रु.३०००००(तीन लाख) पर्यंतचे वै.प्र. प्रस्ताव मंजुरीचे अधिकार मा.C.E.O.यांना अाहे.*
*७* *रु.३०००००(तीन लाख) च्या पुढील वै.प्र. प्रस्ताव मंजुरीचे अधिकार मंत्रालय मुंबई यांना अाहे.*
*८. प्रस्ताव तयार करतांना महत्वाचे म्हणजे प्रस्ताव* *त्रुटी विरहित असावा जेणेकरुन वारंवार परत येणार नाही.*
*म्हणुन अनुभवी व जाणकार व्यक्तीच्या सल्ल्याने सदरील प्रस्ताव तयार करुन सादर करावा.*
*हे सगळे करत असतांना व कागदपत्रांची जमवाजमव करतांना ,प्रस्ताव मंजुर होईपर्यंत बराच त्रास होतो.*
*परंतु शासन cashless योजना लागु करेपर्यंत याला काहीच पर्याय नाही.*
*अाणि त्रासाशिवाय पैसा मिळत नाही हे पन सत्य ...!*
*धन्यवाद........!*
*भाग* 1⃣1⃣ (अ)
*सेवानिव्रुत्ती वेतन(पेंशन) विशेष...!*
*सेवानिव्रुत्ती नंतर अनेक कर्मचारी पेंशनसाठी कार्यालयात अापल्याला खेट्या घालतांना दिसतात तरिही महिनो न महिने पेंशन मिळत नाही याचे कारण म्हणजे सेवापुस्तिकेतिल त्रुटी व पेंशन प्रस्तावातिल त्रुटी.*
*वेळेवर पेंशन मंजुरीसाठी खालिल काही गोष्टीची काळजी घेतली तर कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही.*
*प्रस्तावात अाढळुन येणा-या काही महत्वाच्या त्रुटी.* 👇👇👇
*१.वयाबाबत क्षमापन......*
एखादा कर्मचारी शासनाने विहित केलेल्या वयाच्या मर्यादे पेक्षा अधिक वयानंतर सेवेत प्रविष्ठ झाला असेल तर अधिकच्या वयाबाबत क्षमापन करुन घेणे व त्याबाबत नोंद घेणे अावश्यक असते.
उदा. खुल्या प्रवर्गा साठी वयाची मर्यादा २८ वर्ष असेल अाणि २९ वर्षानंतर कर्मचारीसेवेत प्रविष्ठ झाला असेल तर १ वर्षाचे वयक्षमापन मा.मुकाअ मार्फत मा.विभागिय आयुक्तांकडुन करुन घ्यावे लागते.
*अनुकंपा धर्तीवर एखादा कर्मचारी सेवेत आला असेल तर त्यासाठी वयक्षमापनची अावश्यकता नाही परंतु नियुक्ती आदेशात अनुकंपाबाबत उल्लेख असावा आणि सेवापुस्तिकेत तशी नोंद असावी.*
*२.तांत्रिक खंडाबाबत क्षमापन*.....!
एखाद्या कर्मचा-याला सेवेत प्रविष्ठ झाल्यानंतर मधेच काही दिवसाचा खंड दिला असेल तर तेवढ्या दिवासाचा खंड क्षमापित करुन घ्यावा लागतो. खंडाच्या काळातील रजा मंजुर करुन तशी नोंद घेणे गरजेचे असते.
*३.पदोन्नती बाबत विकल्प.*
पदोन्नती घेतली असेल तर त्याबाबतचे विकल्प फार्म सेवापुस्तकेत दिसुन नाही.
खास करुन मुअ/केंप्र/ शिविअ इत्यादि.
विकल्प नसेल तर पुन्हा विकल्प फार्म भरुन सेवापुस्तिकेत जोडणे अावश्यक.
*४.वेतन पडताळणी मधील अाक्षेप*.....
वेळोवेळी करण्यात आलेल्या वेतन पडताळणीत काही अाक्षेप नोंदवले असेल तर त्याची पुर्तता करणे गरजेचे .
उदा. पुनर्वेतन निश्चिती करणे, जादा अदाई अदा करणे.
त्याबाबत आवश्यक त्या नोंदी करणे.व जादा अदाईबाबत विवरणपत्र दोन प्रती मधे सोबत जोडणे आवश्यक.
*५. संगणक परीक्षा( MSCIT) सुट*
वय वर्ष ५० पुर्ण झाले असेल अाणि संगणक परीक्षा उत्तीर्ण नसेल तर त्याबाबत सुट घेवुन तशी नोंद घेणे गरजेचे.
*भाग ११ ची उर्वरीत पेंशनबाबत माहीती पुढच्या ११ ब या भागात.....!*
*.........धन्यवाद!!!*
No comments:
Post a Comment