* भारताचे प्रख्यात अवकाश-शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती *
*🌷 जन्म - १५ ऑक्टोबर १९३१*
👉 *अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम ( जन्म : ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत )* यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे *अकरावे राष्ट्रपती* ( *कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७* ) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते *लोकांचे राष्ट्रपती* म्हणून लोकप्रिय झाले.
*कार्य :-*
*१९६३* मध्ये ते *भारतीय अवकाश संशोधन संस्थेत ( I.S.R.O )* क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही ( सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल ) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा *डीआरडीओ ( D.R.D.O )* मध्ये आले.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हा पासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत ( इस्रो मध्ये ) असताना *सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल - ३* या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या *विक्रम साराभाई अवकाश केंद्रा* चे ते प्रमुख झाले.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील *_अग्नी_* क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी *अर्जुन* हा एम.बी.टी.( *Man Battle Tank* ) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट ( एलसीए ) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. *भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. *
बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले *डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते........

No comments:
Post a Comment