या ब्लॉगचा उद्देश एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.या ब्लॉगची सामग्री सोशल मीडियामधून घेतली आहे.

Tuesday, May 29, 2018

बारावी परीक्षेचा निकाल

बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार.

धुळे दि.29(यूबीजी विमर्श)
           राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात  आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या (बुधवार, दिनांक ३० मे ) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये २०१८ मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १४ लाख४५ हजार १३२ विद्यार्थ्यानी बारावीची परीक्षा दिली आहे. कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यानी परीक्षा दिली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होणार आहे.

 1. www.mahresult.nic.in

2. www.result.mkcl.org

3.
www.maharshtraeducation.com

4.Http://www.knowyouerresult.com

5. hscresult.mkcl.org

6.http://jagranjosh.com

7. www.bhaskar.com
या संकेतस्थळावर हा निकाल पहायला मिळणार आहे.

No comments:

Post a Comment